पेपर विक्रेत्या रिक्षावाल्याला केली मारहाण
पोलीस, आरटीओ यांचं दुर्लक्ष
रत्नागिरी – रत्नागिरी रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षावाल्यांची दादागिरी प्रचंड वाढली आहे. ते कोणालाही अडवून कधीही दादागिरीची भाषा वापरत असतात.
वेळप्रसंगी एखाद्याला मारहाण करण्यापर्यंत ही त्यांची मजल आता पोहोचू लागली आहे.

त्यांच्यामध्ये आलेली ही मुजोरी पोलीस आणि आरटीओने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने वाढली आहे.
रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या रिक्षावाल्यांना परतीच्या प्रवासात प्रवाशांची गरज भासते.
त्यावेळी ते महामार्गावर स्टेशनच्या बाहेर रिक्षा लावतात आणि प्रवाशांची प्रतिक्षा करत असतात. कारण आजच्या महागाईच्या काळात विनाप्रवासी रिक्षा आणणे परवडत नाही.
अशा रिक्षावाल्यांना दरदिवशी दमदाटी सहन करावी लागत आहे. मात्र रत्नागिरी आरटीओ आणि वाहतूक शाखेचे याकडे लक्ष नसल्याचे बोलले जाता आहे.
या ठिकाणी मुजोरगिरी आणि दादागिरी यांचा अनुभव अनेक रिक्षाधारक घेत आहेत.
या ठिकाणाच्या एका रिक्षावाल्याची मुजोरगिरी आता पुन्हा एकदा समोर आली आहे. त्याने एका पेपर विक्रेत्या रिक्षावाल्याला रत्नागिरी रेल्वेस्थानकाबाहेर मारहाण केली आहे.

या घटनेनंतर रिक्षा चालकाने पोलीस स्टेशन रत्नागिरी येथे तक्रार देण्यास धाव घेतली आहे. पेपर विक्रेत्या रिक्षाचालकाला झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यात येत आहे.
ज्या मुजोर रिक्षा चालकाने त्या गरीब स्वभावाच्या बाजारपेठ येथे राहण्याऱ्या रिक्षावाल्याला तातडीने न्याय मिळावा यासाठी शहरातील रिक्षाचालकांनी देखील आवाज उठविला आहे.
पोलिसांनी रेल्वे स्टेशनच्या रिक्षा स्टॅन्ड वर अतिशय गंभीरपणे लक्ष देणे एवढ्यासाठीच आवश्यक आहे, कारण आज जर लक्ष दिलं नाही तर पुढे त्या ठिकाणी मोठे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या ठिकाणचे रिक्षा चालक हे झुंडीने येतात आणि रेल्वे स्टेशन पासून थोड्या अंतरावर थांबलेल्या रिक्षा चालकांशी दादागिरीची भाषा वापरतात. त्यांच्याशी असभ्यपणे वर्तन करतात, त्यांच्या अंगावर चाल करतात.
पण यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही? हा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे? रेल्वे स्टेशनच्या बाहेर मेन रस्त्यावर पोलीस चौकी देखील आहे.
चौकीपासून अगदी काही अंतरावर जर अशा घटना होत असतील तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असं जनतेमधून बोललं जात आहे.