चिपळूणमधील उड्डाणपुलाचा गर्डर जमीनदोस्त

चिपळूण – मुंबई – गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर सोमवारी सकाळी ८ वाजता मधोमध खचल्याचा प्रकार घडला होता.

व्हिडिओ

मात्र दुपारी हा पूल लाँचरच्या यंत्रणेसह अचानक कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची पळापळ झाली.

या घटनेने चिपळुणात खळबळ उडाली असून घटनास्थळी प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. नागरिक करत गर्डरमधील स्टीलसह काँक्रीट देखील तुटले.

मुंबई – गोवा महामार्गावर चिपळूण बहादूरशेख नाका कार्यालय पर्यंत उड्डाणपूल होत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणातील हा सर्वात मोठा उड्डाणपूल असून सुमारे १.८१ की. मी. इतकी या पुलाची लांबी आहे.

तर ४६ पिलर त्यासाठी उभारण्यात आले आहेत. या पुलाच्या पिलरचे काम पूर्ण झाल्या नंतर शहरातील बहादूरशेख येथून पिलरवर गर्डर चढवण्याचे क सुरू होते.

मात्र नव्याने चढविलेले गर्डर सोमवारी सकाळी ८ वाजता काम सुरू असतानाच खचले. यावेळी मोठा आवाज झाला झाला. या घटनेमुळे आधीच चिपळूणकर धास्तावले असताना सोमवारी दुपारी गर्डर उभारण्यासाठी वरती ठेवलेल्या लाँचरसह नवीन पूल कोसळला.

या घटनेवेळी मोठा आवाज झाला आणि जणू परिसरातील नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकली. बहाद्दूर शेख नाक्यावर एकच धावपळ उडाली. वाहन चालकांसह नागरिकांनी देखील अक्षरशः धूम ठोकली.

या घटनेची माहिती मिळताच आमदार शेखर निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बहाद्दूर शेख नाक्यावर प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली असून नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे.

या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला असून बाजूनी वाहनांची रांग लागली आहे. त्यामुळे जागोज पोलीस बंदोबस्त तैनात करून हळूहळू वाहने सोडली जात आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*