राजापूर : आई पावनादेवी युवा मित्र मंडळ जवळेथर आयोजित भव्य-दिव्य प्रकाशझोतातील गावमर्यादित अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा राजापूरच्या मधलीवाडी येथे शनिवार, दि. १ व २ मार्च २०२५ रोजी रंगणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

प्रथम क्रमांक ९,९९९ रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ७,७७७ रुपये व आकर्षक चषक, तर तृतीय क्रमांक ५,५५५ रुपये व आकर्षक चषक असणार आहे.

प्रत्येक सामन्यासाठी ‘सामनावीर’ मेडल, तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर आणि क्षेत्ररक्षकाला चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ८०० रुपये प्रवेश शुल्क असून, सर्व सामने ३ षटकांचे खेळवले जातील. सामना कंपल्सरी चेस असेल आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील.

तसेच, स्पर्धेत केवळ गावमर्यादित खेळाडूंनाच संधी मिळणार आहे. यासाठी खेळाडूंनी ओरिजिनल आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी युवराज मोरे (९४०४११२८६६), महेश लाड (९४०३३८६७५९ / ९४०३३८७७५९), आणि संदीप शेठ मोरे (९४०४७७५०१४) यांच्याशी संपर्क साधावा.