गोगटेच्या झेप महोत्सवामध्ये हिमांशू संभेकर किंग आणि सोनाली भुजबळ क्वीनचा किताब पटकवला

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या झेप महोत्सवामध्ये व्ही.पी.सी.(व्हर्सटाईल पर्सनॅलीटी कॉन्टेस्ट) किंग आणि क्वीन ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये व्ही. पि. सि. किंग या स्पर्धेमध्ये हिमांशू संभेकर (एस वाय बॅफ) या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक तुषार यादव (एस वाय बी ए), तृतीय क्रमांक मनोज शौचे (एस वाय बी कॉम) या विद्यार्थ्यांनी पटकावला. तसेच व्ही.पी.सी. क्वीन स्पर्धेत सोनाली भुजबळ (टी वाय बी एम एस) या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक मोहिनी माणकर (टी वाय बी एस सी) आणि तृतीय क्रमांक सानिका चव्हाण (एफ वाय बी ए) या विद्यार्थिनीने पटकावला. या स्पर्धेसाठी ॲड. निलोफर खान, सिरीन काझी आणि अक्षय चाळके हे परीक्षक म्हणून लाभले होते. तसेच नॅशनल मेडिकल रत्नागिरी यांच्यातर्फे व्ही.पी.सी. किंग आणि क्वीन या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे तन्मय सावंत यांच्या हस्ते गिफ्ट हॅम्पर देण्यात आले. स्पर्धेच्या आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख व झेप समन्वयक डॉ.आनंद आंबेकर आणि विद्यार्थी समन्वयक प्रा.शुभम पांचाळ विद्यार्थी सचिव ईशान पालेकर यांनी विशेष प्रयत्न केले. सर्व आयोजकांचे व विजेत्यांचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, कला शाखा उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*