रायगड जिल्ह्यातील महाड पोलिस ठाण्यात आज अचानक स्फोट झाला. गुन्ह्यात जप्त केलेले बॉम्ब निकामी करताना ही दुर्घटना घडली. या स्फोटात बॉम्ब शोधक पथकातील तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. रमेश कुटे, आशीर्वाद लदगे आणि राहुल पाटील अशी त्यांची नावे आहेत. दोघांना तातडीने मुंबईत हलविण्यात आले आहे. एका गुन्ह्यात महाड पोलिसांनी गावठी बॉम्ब जप्त केले होते.