दापोली : ‘दापोली महोत्सव श्री’ ही खेड, मंडणगड आणि दापोली तालुका मर्यादित बॉडी बिल्डींग स्पर्धा नुकतीच दापोलीमध्ये उत्साहात पार पडली.
या स्पर्धेमध्ये किताब विजेता निखिल नलावडे (खेड, आर. के. फिटनेस, खेड), मेन्स फिजिक्स शुभम दिवेकर (बॉडी गॅरेज खेड), तर बेस्ट पोजर साहिल गुरव (लाईफ स्टाईल फिटनेस, दापोली), निशांत शिर्के (मोस्ट इंम्पुरंड खेड) हे विजेते ठरले.
तसेच दापोली श्री टॉप 10 बॉडी बिल्डींग स्पर्धा दापोली तालुका मर्यादित यांचा किताब विजेता सैफ सय्यद (लाईफ स्टाईल फिटनेस, दापोली) याने पटकावला.
या स्पर्धेचे सांघिक विजेतेपद लाईफस्टाइल फिटनेस दापोली या जीमने सर्वाधिक पदके पटकावून जिंकले. या स्पर्धे मध्ये आदित्य आरेकर, अजलान काद्री, राजेश पवार, दर्शन वाडकर, ऋषिकेश धामणे, साहिल गुरव, अनुराज यादव, श्रेयस बांद्रे, वेद रांगले, प्रतीक बांद्रे, ओंकार देवळे, साईप्रसाद वराडकर, हर्ष पाटील आदी खेळाडू लाईफस्टाइल फिटनेस जीम तर्फे सहभागी झाले होते.
आपला दापोली महोत्सवामध्ये ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. यामध्ये सव्वा लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि स्पर्धकांना आकर्षक चषक देण्यात आले. शिवाय स्पर्धकांना भेटवस्तूही देण्यात आले.
बॉडी बिल्डींग एंड फिजिक्स स्पोर्ट असोसिशन रत्नागिरी यांच्या माध्यमातून लाईफस्टाईल फिटनेस दापोली यांच्या आयोजनाखाली वजनी गटाच्या स्पर्धा दापोलीत पार पडल्या.
या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंचाची टीम खास रत्नागिरी व रायगड येथून मागवण्यात आली होती. दापोली तालुका बॉडीबिल्डिंग एंड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व लाईफ स्टाईल फिटनेसचे सदानंद बारटक्के यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.
भविष्यात होतकरून मूलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी अशाच भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले जाईल, असं सदानंद बारटक्के यांनी सांगिलं.