जमात ए उल्मा ए हिंद तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

रत्नागिरी/प्रतिनिधी

कोरोना कालावधीत रक्ताची गरज सातत्याने भासत असते. कधीकधी अचानक रक्ताची आवश्यकता भासते आणि रुग्णाच्या नातेवाईकांची मोठी धावपळ उडते. रुग्णांच्या नातेवाईकांची ही गैरसोय दूर व्हावी यासाठी जमात ए उल्मा ए हिंद या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे.

रत्नागिरी येथील जमात ए उल्मा ए हिंद या संस्थेने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. अचानक लागणारा रक्तसाठा रक्तपेढीत उपलब्ध असावा यासाठी या संस्थेने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला रक्तदात्यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान करुन या सामाजिक सेवेत सहभाग घेतला. यावेळी संस्थेचे मुफ्ती तौफिक सारंग, सुहेल मुकादम, मन्सूर काझी, इम्रान सय्यद, मौलाना बगदादी आदी उपस्थित होते.

– माय कोकण
https://mykokan.in

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*