ब्लॅक फंगसवरील औषधं ‘टॅक्स फ्री’; कोरोना लसीवरचा GST कायम

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज नवी दिल्लीत ४४ वी बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यात म्युकरमायकोसिसवरील सर्व औषधं टॅक्स फ्री करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अॅम्ब्युलन्सवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून आता १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय कोरोना संबंधीच्या उपकरणांवरील जीएसटी देखील कमी करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना लसीवर ५ टक्के जीएसटी यापुढेही कायम राहणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. आज बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची अधिसुचना उद्या जारी केली जाईल असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच जीएसटीचं आज जारी करण्यात आलेले दर ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत लागू राहणार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*