जे वैफल्य ग्रस्त असतात. निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते. भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली आहे. त्यांचा पक्ष जागतिक स्तरावरचा पक्ष आहे.उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात. पण काही झालं तरी महाराष्ट्रात त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही. महाराष्ट्रात पुढचे 25 -30 वर्ष तरी त्यांची सत्ता येणार नाही. तोपर्यंत भाजप राहिल की नाही माहीत नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. 2024मध्ये ज्या निवडणूक होणार आहेत, त्यातही दिल्लीतील चित्रं बदलून जाईल. त्यांनी महाराष्ट्र विसरून जावं आता. ठिक आहे 100 लोकं जिंकतील, 75 लोकं जिंकतील अजून काही करतील पण महाविकास आघाडी हेच या महाराष्ट्राचे भविष्य आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.