माजी खासदार किरीट सोमय्या सोमवार दि 17 मे रोजी रत्नागिरीत येत असून ते जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत. पालकमंत्री तथा परिवहनमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. अनिल परब यांच्या दापोली येथील जागा व रिसॉर्ट व्यवहारा तक्रारी संदर्भात ही भेट घेणार आहेत. श्री. अनिल परब यांच्या दापोलिस्थित जमीन व्यवहारा संदर्भात काही गंभीर मुद्दे सोमय्या यांनी उपस्थित करून तक्रारी दाखल केल्या आहेत या पार्श्वभूमीवर सोमवारचा सोमय्यांचा दौरा चर्चेचा विषय झाला आहे.
आज भाजपा च्या 3 खासदारांनी पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोलिस्थित जागा खरेदी संदर्भाने केंद्रीयमंत्री ना. प्रकाश जावडेकर यांच्याकडे ही तक्रार दाखल केली आहे. खासदार गिरीष बापट,खा.गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक यांनी पत्र देऊन या प्रकरणाची तड लावण्या ची विनंती केली आहे.
उद्या किरीट सोमय्या हे या विषयावर कसा प्रकाश टाकतात या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.