भाजपा रत्नागिरीमध्ये 4 कोव्हिड सेंटर सुरू करणार

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरीतील कोव्हिड स्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी 25 बेडची सुसज्ज कोव्हिड सेंटर उभारणार आहे.

आ. प्रसाद लाड, आ. रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, जिल्हासरचिटणीस राजेश सावंत, युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांचेसह ऑनलाईन बैठक केली.

त्या बैठकीमध्ये कोव्हिड सेंटर उभारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. तसेच प्रसाद लाड हे 50 ऑक्सिजन कॉनसनट्रेटर जिल्ह्याला बुधवार दिनांक 19 मे 2021 रोजी भा.ज.पा. युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांच्याकडे सुपूर्त करणार असून त्या माध्यमातून ऑक्सिजन बँकेची उपयुक्त संकल्पना राबवण्यात येणार आहे.

2 ॲम्बुलन्सही भा.ज.पा.साठी उपलब्ध करून देण्याचे रविंद्र चव्हाण व प्रसाद लाड यांनी सांगितले. तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी जिंदाल कंपनीचे माध्यमातून भा.ज.पा. एक अतिरिक्त ऑक्सिजन टॅंक सप्लाय करणार असून त्यासही तांत्रिक मंजुरी द्यावी, अशी मागणी माजी खासदारक्षनिलेश राणे यांनी केली. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

‘व्हिसी’वर चर्चा करताना

कोव्हिड परिस्थितीमध्ये कोणतेही राजकारण न करता संपूर्ण सहकार्य भा.ज.पा. करेल असे आ. रवींद्र चव्हाण यांनी आश्वासित केले. ग्राम दक्षता समित्या अधिक सक्रिय करा, त्यांच्यासाठी काही आर्थिक तरतुद करा तसेच सिव्हिल हॉस्पिटलमधील पावसाचे पाणी साचण्याचा प्रकार लवकर नियंत्रणात आणा, अशा सूचनाही आ. रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. माजी खा. निलेश राणे यांनी आपल्या हॉस्पिटलच्या संपर्कातून तज्ञ डॉक्टर व काही प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध करून देत असल्याचे स्पष्ट केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*