कोकण रेल्वे मार्गावर भावनगर- कोच्युवेली साप्ताहिक स्पेशल रेल्वे

कोकण रेल्वे मार्गावर भावनगर- कोच्युवेली साप्ताहिक स्पेशल रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार १३ एप्रिल ते ८ जून या कालावधीत ही स्पेशल गाडी धावणार आहे. ही गाडी दर मंगळवारी सकाळी १०.०५ वाजता भावनगर येथून सुटेल. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता कोच्युवेलीला पोहोचेल.परतीच्या प्रवासात कोच्युवेली येथून सायंकाळी ३.४५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी १२.२५ वाजता भावनगरला पोहोचेल. वसईमार्गे ही गाडी धावणार आहे. त्यामुळे वसई, विरार, नालासोपारा, येथिल प्रवेशाना ही गाडी उपयुक्त ठरणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*