खेड : महामार्गावरील भरणे येथील जिल्हा परिषद शाळा येथील निर्जन इमारतीच्या शेजारी तीनपत्तीचा जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकून ६ हजार ४७० रुपये जप्त करीत तीन जणांना अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरणे येथील जिल्हा परिषद शाळे जवळ गेली अनेक वर्षे लोहार नामक मटका जुगार आणि तीन पत्ती व्यावसायिक याचा मोठा अड्डा चालू आहे.
येथील प्रभाकर नागनाथ लोहार (३७), सुरेश प्रकाश लोहार (३२) आणि निलेश महेंद्र शिगवण (४२, तिघे रा. भडगाव, ता. खेड) हे तिघेजण तीनपत्तीचा खेळ खेळवत होते.
याची खेडच्या पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने या ठिकाणी धाड टाकली आहे. या कारवाईत ६ हजार ४७० रुपये रोकडसह जुगार खेळण्याचे साहित्य आणि तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खेड पोलीस ठाण्यात या तिघांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलमानुसार कारवाई केली आहे.
खेडमधील जुगार अड्ड्यांवर कारवाई, शेजारील तालुक्यात कधी?
खेड प्रमाणे दापोली, मंडणगडमध्येही राजरोसपणे जुगाराचे अड्डे सुरू आहेत. त्यावर कारवाई का होत नाहीये? असा सवाल जनतेमधून विचार जात आहे. संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? हे प्रश्न उपस्थित होत आहेत.