केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी आता एकच डिजिटल प्रोफाईल असणार आहे. या योजनेला ‘सिंगल साईन ऑन’ असे नाव देण्यात आले, यामध्ये एकाच आयडीद्वारे सर्व प्रकारच्या सरकारी सेवांचा लाभ घेता येणार – येत्या ऑगस्टपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे आता एकापेक्षा अधिक लॉगिन आयडी-पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाही – असेही केंद्र सरकारने म्हटले आहे
कशी असणार हि योजना ? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचे एकत्रीकरण करण्यासाठी नवीन ॲप सुरु केले आहे. या ॲपवर आपल्याला वर्षातून एकदाच नोंदणी करावी लागणार – त्यानंतर एकाच आयडीद्वारे प्रत्येक प्रकारच्या योजनेचा लाभ आपल्याला आयुष्यभर घेता येईल
सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला आधीच यामध्ये फॉर्म भरवा लागणार, त्यानंतर आपल्याला कोणत्याही सुविधेसाठी अर्ज करायचा असल्यास फॉर्म उघडताच अर्जदाराशी संबंधित सर्व माहिती वेगवेगळ्या कॉलममध्ये आपोआप भरली जाईल आपल्याला फक्त ‘ओके’ बटणावर क्लिक करावे लागणार
कोणत्या सुविधा मिळणार ?
या पोर्टलवर शाळा, महाविद्यालयीन प्रवेश, शैक्षणिक प्रमाणपत्र, वीज-पाणी बिल जमा करणे, रेल्वे – विमान तिकीट, मालमत्ता कर, प्राप्तिकर रिटर्न, जीएसटी रिटर्न भरणे, व्यवसाय परवानगी तसेच शिष्यवृत्ती अर्ज, व्यवसाय मान्यता, स्टार्टअप नोंदणी यासंबंधीच्या सुविधा मिळणार आहेत. याव्यतिरिक्त पासपोर्ट, आधार, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, गॅस कनेक्शन, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड, विवाह-जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, पीएफ, शस्त्र परवाना आणि व्यापार परवाना या सुविधाही मिळणार आहेत.