लांजा-रत्नागिरी मार्गावर पुनस येथे बिबट्याचे पिल्लू सापडले

रत्नागिरी/लांजा: लांजा-पुनस-रत्नागिरी मार्गावर पुनस फोपळवणे येथे रविवारी रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान अवघ्या १५ ते २० दिवसांचे बिबट्याचे पिल्लू रस्त्यावर आढळले.

वनविभागाला याची माहिती मिळताच लांजा वनपाल सारिक फकीर यांनी घटनास्थळी धाव घेत पिल्लाला ताब्यात घेतले. सध्या हे पिल्लू लांजा येथील वनविभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आहे.

वनविभागाने पिल्लाची आई, मादी बिबट्या, परत येईल या आशेने त्याला काही वेळ घटनास्थळी ठेवले होते. मात्र, मादी बिबट्या न आल्याने पिल्लाला लांजा येथे आणण्यात आले.

अतिशय लहान असल्याने त्याला थेट जंगलात सोडणे शक्य नसल्याने सातारा येथून तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर पिल्लाला जंगलात सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*