चंद्रनगर शाळेतील शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार

दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगर येथे कार्यरत असलेले शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना आदर्श कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दापोली पंचायत समितीच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. शिवजयंतीच्या कार्यक्रमात, महाराष्ट्राचे गृह, महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते घाडीगांवकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दापोली पंचायत समिती दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने आदर्श कर्मचाऱ्यांची निवड करते आणि त्यांना पुरस्कृत करते. या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहभोजन आयोजित केले जाते.

चंद्रनगर शाळेतील लोकप्रिय आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जाणारे बाबू घाडीगांवकर यांना यंदाचा आदर्श कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*