अविनाश वल्हार याचा सुनील सकपाळ यांच्या हस्ते सत्कार

दापोली : लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, लोकमान्य टिळक विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज चिखलगाव, येथे बारावीत शिकणाऱ्या अविनाश महादेव वल्हार याने नुकत्याच झालेल्या, जिल्हास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या 19 वर्षे वयोगटामध्ये 400 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

त्याची 21 ते 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली. या निमित्ताने केंद्र प्रमुख सुनील सकपाळ यांनी त्याचा सत्कार केला.

सुनील सकपाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले तसेच अविनाशला रोख रक्कम व पारितोषिक अशी भेट दिली.

तसेच अविनाशच्या आईंचा पुष्पगुच्छ देऊन त्याला दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास विश्वस्त सरपंच दिनेश आडविलकर, शाळेचे क्रीडा प्रमुख सहदेश माळी, संस्थेचे व शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*