Author: माय कोकण टीम

पोलीस स्थापना दिनानिमित्त शिवसेनेकडून पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांचा सन्मान

दापोली : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त (२ जानेवारी) शिवसेना पक्षाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा…

नासा-इस्रो चाळणी परीक्षेत चंद्रनगर शाळा अव्वल!

दापोली- दापोली तालुकास्तरीय नासा-इस्रो चाळणी परीक्षेत तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगरच्या दोन विद्यार्थिनींनी अव्वल यश संपादन केले असून त्यांची रत्नागिरी जिल्हास्तरीय चाळणी परीक्षेसाठी निवड झाली आहे. रत्नागिरी…

रत्नागिरीत भाजपचा विजयोत्सव! नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा भव्य सत्कार; महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांचा पुढाकार

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा (दक्षिण) जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे यांच्या पुढाकाराने नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जिल्हा कार्यालय रत्नागिरी येथे…

ना. उदय सामंत – उद्योग, संस्कृती आणि मराठी अस्मितेचे नेतृत्व

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला गती देताना आणि मराठी भाषेच्या अस्मितेला सशक्त करताना समतोल राखणारे नेतृत्व म्हणून ना. उदय सामंत यांचे कार्य उल्लेखनीय ठरते. उद्योग मंत्री तसेच मराठी भाषा मंत्री या दुहेरी…

सामंताचा (आमचा ) उदय महाराष्ट्राचं हृदय

– बेबी मावशी छत्रपती शिवरायाच्या ‘राकट देशा कणखर देशा’ महाराष्ट्र देशाचा उद्योगमंत्री, ‘माझी मर्‍हाटाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके’ ह्या ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीने संपन्न असणार्‍या मराठी भाषेचा मंत्री, चौदा विद्या…

‘नाटक तमाशाचं’ च्या प्रयोगाने रत्नागिरीकर रसिक मंत्रमुग्ध

रत्नागिरी : कोकणातील कलावंतांची खाण असलेल्या रत्नागिरीत रविवारी (२१ डिसेंबर) सावरकर नाट्यगृहात ‘नाटक तमाशाचं’ या बहारदार नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. महाराष्ट्राच्या लोकधारेचे आणि लुप्त होत चाललेल्या लोककलांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या या…

कृष्णामामा महाजन स्मृति पुरस्कार डॉ. मधुकर लुकतुके यांना मरणोत्तर प्रदान

दाभोळ (रत्नागिरी) : कोळथरे येथील कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित कृष्णामामा महाजन स्मृति पुरस्कार यंदा दाभोळचे सुप्रसिद्ध डॉ. मधुकर लुकतुके यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. हा १४वा पुरस्कार आयुष्मान…

दापोलीत थंडीची लाट: किमान तापमान ६.९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली

दापोली (जि. रत्नागिरी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील ग्रामीण कृषी मौसम सेवेच्या निरीक्षणानुसार, १९ डिसेंबर २०२५ रोजी मागील २४ तासांमध्ये दापोली परिसरात हवामान कोरडे राहिले असून,…

उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, अथायु हॉस्पिटल कोल्हापूर, उदय सामंत वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि…

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे निधन

नोएडा : जगातील सर्वात उंच प्रतिमा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे डिझायनर आणि ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम वनजी सुतार यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. त्यांनी नोएडा येथील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास…