दापोली : दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडलेल्या वार्षिक सभेमध्ये जेसीआय दापोलीच्या अध्यक्षपदी (2022)दापोलीतील उदयोन्मुख व्यवसायिक व समाजसेवक अतुल गोंदकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी सचिवपदी मयुरेश शेठ तर खजिनदारपदी प्रसाद दाभोळे यांची निवड करण्यात आली. जेसी अतुल गोंदकर यांनी यापूर्वी म्हणजे सन 2021 मध्ये जेसीआय दापोलीचा सेक्रेटरी म्हणून पदभार पाहिला होता. मावळते अध्यक्ष कुणाल मंडलिक यांच्याकडून ते सुत्रं स्विकारणार आहेत.
अध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.