गुहागर तालुक्यातील देवघर येथील अथर्व जितेंद्र गोंधळेकर हा कृष्णाचा भक्त असलेला मुलगा द्वारका (गुजरात) येथे इस्कॉन मंदिरात आज सकाळी सापडला आहे. इस्कॉन मंदिर व्यवस्थापनाच्या सांगण्यावरुन त्याने त्याच्या आईला संपर्क केला. सदर मुलगा सध्या त्या मंदिर व्यवस्थापनाच्या ताब्यात आहे. त्याचे आई-वडील त्याला आणण्यासाठी जात आहेत.