राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री उदय सामंत यांनी आमदार राजन साळवी यांना मारण्याची धमकी देणाऱ्याला तात्काळ पकडावे व आ. राजन साळवी यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी गृहमंत्री वळसेपाटील यांना लेखी पत्राने केली आहे.
आमदार राजन साळवी यांना जीवे मारण्याला तात्काळ पकडावे व आमदार राजन साळवी याच्या सुरक्षेत वाढ करावी. अशी ही मागणी या पत्राद्वारे केली आहे. आमदार राजन साळवी यांना जीवे मारण्याची धमकी ने एकच खळबळ उडाली आहे . दरम्यान याबाबत शहर पोलिस ठाण्यात दिनांक 12 जानेवारी रोजी आमदार राजन साळवी यांनी तक्रार दाखल केली आहे.
आ. राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्प बाबत विरोधी भूमिका घेतल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबांना मारण्याची धमकी या फोनद्वारे देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की आमदार राजन साळवी हे लांजा राजपुर मतदारसंघात सेनेचे आमदार म्हणून 2009 सालापासून कार्यरत आहेत.
नाणार रिफायनरी प्रकल्प ला स्थानिक जनतेच्या सोबत राहून विरोध दर्शविल्याने त्यांना मोबाईल क्रमांक 92 65 44 05 76 या फोनवरून आमदार राजन साळवी यांच्या मोबाईल वर 99 70 16 90 25 यावर दिनांक 10/ 1/ 2022 रोजी पहिला संध्याकाळी साडे सात वाजता फोन आला. त्यात अज्ञात इसमाने मोबाईल वरून त्यांना सांगितले की रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख एवढे बोलून त्याने फोन बंद केला आणि त्याच दिवशी रात्री 11 वाजून14 मिनिटाच्या सुमारास परत फोन करून रिफायनरी मे हमारा पैसा लगा हुआ है, अपोज मत करना नही तो तुझे और तेरे परिवार को ठोक देंगे अशी धमकी आल्याने आमदार राजन साळवी यांनी 12/01/22 शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे . दरम्यान राजन साळवी जीवे मारण्याचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.