महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021साठी बैठक व्यवस्था

रत्नागिरी दि. 20 :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 ही रविवार 23 जानेवारी 2022 रोजी रत्नागिरी तालुक्यातील 03 उपकेंद्रावर दोन सत्रामध्ये (प्रत्यक्ष परीक्षेची वेळ सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 व दुपारी 03.00 ते सायंकाळी 05.00) या वेळेत घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी एकूण 1188 उमेदवार परीक्षेस बसणार आहेत. परीक्षेची बैठक व्यवस्था खालीलप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील 03 उपकेंद्रावर करण्यात आलेली आहे.

उपकेंद्राचे नाव- पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी ता.जि.रत्नागिरी
बैठक क्रमांक RT001001 ते RT001432 उपकेंद्राचे नाव -गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी, ता.जि.रत्नागिरी
बैठक क्रमांक RT002001 ते RT002408

उपकेंद्राचे नाव – फाटक हायस्कूल, रत्नागिरी ता.जि.रत्नागिरी बैठक क्रमांक RTO03001 ते RT003348 सदर परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा/गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे.

परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत.

परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी (Frisking) करण्यात येणार आहे.

आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक/भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी रत्नागिरी सुशांत खांडेकर यांनी कळविले आहे.
000

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*