दापोली – गुरुवार दिनांक 10 मार्च रोजी ऑलिंम्पियाड परीक्षेचा निकाल लागला असुन या परीक्षेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा कु.आराध्य अतुल मेहता या विद्यार्थ्यांने महाराष्ट्र राज्यात व देशाच्या पश्चिम विभागात ऑलिंम्पियाड सामान्य ज्ञान परीक्षा मध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावुन सुवर्ण पदक संपादन केले आहे.

त्याबोबरच कु. श्रियान सुजय मेहता (इयत्ता पाचवी) यांनं महाराष्ट्र राज्यात सत्तावीस व देशाच्या पश्चिम विभागात एकोणतीस क्रमांक पटकावुन सुवर्ण पदक संपादन केले आहे.

कु. दिव्यांशी नरेंद्र परदेशी (इयत्ता सहावी) हिने शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक तर कु. आयुष अशोक मळेकर (इयत्ता चौथी) आणि कु. वर्धन विद्याधर जालगावकर (इयत्ता पाचवी) याने द्वितीय क्रमांक मिळवून सिल्वर पदक संपादन केले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनचे संस्था संचालक सुजय मेहता तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रितु मेहता तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.