दापोली शहरातील विविध सामाजिक क्षेत्रात काम करणा-या विविध स्वयंसेवी संघटना यांना आवाहन करणेत येते की, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत माझी रत्नागिरी माझी जबाबदारी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे मार्गदर्शनांतर्गत आपण कोरोना मुक्त माझी दापोली माझी जबाबदारी मोहिम राबविणेकरीता शहरातील प्रत्येक घरोघरी जावून नागरीकांचे ऑक्सीजन लेवल तपासणे व इतर कोरोना सदृष्य लक्षणे तपासणी करणे सर्वेक्षणांतर्गत तपासणी करणेसाठी स्वयंसेवक, सामाजिक संघटना, मंडळे, धार्मिक संस्था, पथके इ. स्वयंस्फूर्तीने दापोली नगरपंचायत सोबत सर्वेक्षणाचे काम करणेसाठी इच्छुक असल्यास तात्काळ नगरपंचायतीकडे दि.02 मे 2021 रोजी स. 11.00 ते 1.00 वा. पर्यंत या वेळेत आपला प्रतिनिधी पाठवून नगरपंचायत कार्यालयास संपर्क करावा.
– महादेव रोडगे
मुख्याधिकारी दापोली नगरपंचायत, दापोली