पंतप्रधान नरेंद्र मोदींची करोनाचा फटका बसलेल्या १० राज्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय सचिव, पंतप्रधानांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिव उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी पंतप्रधान कार्यालयाकडून राज्यांच्या दौऱ्याची माहिती देण्यात आली. केंद्रीय पथकं महाराष्ट्रासोबतच पंजाब आणि छत्तीसगडचाही दौरा करणार आहेत. या पथकांमध्ये आरोग्य तज्ञ तसंच डॉक्टरांचा समावेश असेल. पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात मास्क तसंच सोशल डिस्टन्सिंग या नियमांचं पालन न केल्यानेच रुग्णसंख्येत इतकी मोठी वाढ होत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.