दापोली : दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे व्यापक जनजागृती मोहीम दापोलीत राबवण्यात आली. कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक १०६४ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले.

नगर पंचायत दापोली, तहसिलदार कार्यालय दापोली येथे भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत विशेष बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील व पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाचप्रतिबंधक कायद्याची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र दापोली, सेतु कार्यालय, उपकोषागार कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय दापोली, दापोली बाजारपेठ, दापोली पोलीस ठाणे, दापोली बस स्थानक तसेच दाभोळ धोपावे फेरीबोट परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष भेटी देऊन कर्मचारी व नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधी जनजागृती केली. लाचखोरांविरुद्ध तक्रार नोंदवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क:

  • अविनाश पाटील, पो.उ.अ., लाप्रवि (मो. ७५८८९४१२४७)
  • मच्छिंद्र जाधव, पो.नि., लाप्रवि (मो. ९८७०४७४५३५)
  • सुहास रोकडे, पो.नि., लाप्रवि (मो. ९०६७०३५९१०)
  • फोन: ०२३५२-२२२८९३
  • टोल फ्री: १०६४
  • संकेतस्थळ: acbmaharashtra.gov.in
  • ई-मेल: acbratnagiri@gmail.com, dyspacbratnagiri@mahapolice.gov.in