आता आणखी एक स्वदेशी लस काही महिन्यांत बाजारात येणार

हैदराबादच्या बायोलॉजिकल-ई लिमिटेड सोबत केंद्र सरकारने करार केला असून या कंपनीकडून ऑगस्ट ते डिसेंबर या काळात तीस कोटी डोस केंद्र सरकार विकत घेणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारेन दीड हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम कंपनीला दिली आहे. सध्या ही लस तिसऱ्या फेजच्या ट्रायल मध्ये आहे. बायोलॉजिकल-ई कंपनीचे डोस ऑगस्ट ते डिसेंबर या काळात तयार होणार असल्याची माहिती आहे. सध्या या लसीची चाचणी तिसऱ्या फेज मध्ये आहे. या आधीच्या दोन फेजमध्ये लसीचे रिपोर्ट प्रभावी आले आहेत. बायोलॉजिकल-ई कंपनीकडून तयार करण्यात येणारी लस ही आरबीडी प्रोटिन सब-युनिट लस असून येत्या काही महिन्यात ती बाजारात येण्याची शक्यता आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*