आंजर्ले प्रभागात एम के हायस्कूल येथे शैक्षणिक यशाचा सन्मान सोहळा

दापोली : तालुक्यातील आंजर्ले प्रभागातील विविध स्पर्धा परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळा 29 एप्रिल, मंगळवारी एम के हायस्कूल, आंजर्ले येथे उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रभाग विस्तार अधिकारी, कांगवई केंद्रप्रमुख, आडे पाडले केंद्रप्रमुख, सुकोंडी केंद्रप्रमुख, केळशी केंद्रप्रमुख यांची उपस्थिती होती. एम के हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी अध्यक्षस्थान भूषवले, तर सूत्रसंचालन प्रभारी शिक्षक यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, राज्यगीत आणि प्रार्थनेने झाली, ज्याचे सादरीकरण एम के हायस्कूलच्या गीत मंचाने केले. यानंतर व्हिजन दापोली, पाचवी शिष्यवृत्ती, इस्रो-नासा, RTS, नवोदय अशा विविध स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान विस्तार अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांची यादी खालीलप्रमाणे:
व्हिजन दापोली इयत्ता चौथी तालुका गुणवत्ता यादी:
1. वरदा देशपांडे (आंजर्ले नं. 1) 
2. आराध्या घरवे (मुर्डी नं. 1) 
3. स्पृहा पेंडसे (मुर्डी नं. 1) 
4. विधी पडळकर (केळशी नं. 1) 
5. सिद्धार्थ घरवे (मुर्डी नं. 1) 
6. आराध्य सावंत (पिचडोली) 
7. रुद्र परांजपे (आंजर्ले नं. 1) 
8. नफीस मुकादम (मांदिवली उर्दू) 
9. वीरा रुके (भोमडी) 

नवोदय निवड:
1. प्राप्ती जाधव (सुकोंडी बोरथळ) 
2. विनीत राणे (विरसई) 

इस्रो भेट निवड:
1. विनीत राणे (विरसई) 

नासा अमेरिका भेट निवड:
1. जान्हवी तांबुटकर (विरसई) 
2. अथर्व तांबिटकर (विरसई) 

रत्नागिरी प्रज्ञाशोध जिल्हा गुणवत्ता यादी:
1. जान्हवी तांबुटकर (विरसई) 
2. सृष्टी पिंपळकर (विरसई) 
3. शिवानी मांडवकर (केळशी नं. 1) 

याशिवाय, तालुका स्तरावरील आदर्श शिक्षक म्हणून विनय राणे, प्रभारी शिक्षक, स्नेहा तळदेवकर, कविता मयेकर यांचा सन्मान करण्यात आला. विस्तार अधिकाऱ्यांनी आंजर्ले प्रभागाच्या उत्तम कामगिरीबद्दल अभिनंदन करत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता मुख्याध्यापक यांच्या भाषणाने झाली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*