रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंबेशेत च्या जंगलात आज सकाळी नऊ च्या सुमारास एका सुमारे ४० वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला.
दापोली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत मोरे हे गुरे चरविण्यासाठी जंगलात गेले असता त्याना एक अनोळखी इसम कुशीवर झोपलेला आढळून आला. मात्र तो मृत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सदर बाब दापोली पोलीस स्थानक येथे नोंद केली.घटनेचा पुढील तपास स.पो.फौजदार चव्हाण करित आहेत.