युक्रेन मध्ये अडकलेल्या विधर्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारतातून ऑपरेशन गंगा राबवले जात आहे. जवळपास हजारच्यावर विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत दिल्ली असेल मुंबई नागपूर या शहरांमध्ये आणण्यात आलेले आहे मात्र आता एक दुःखदायक बातमी समोर आली असून एका भारतीय विद्यार्थ्याचा रशियन सैन्याच्या गोळीबाराच्या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना युक्रेन मधील खारकीव मध्ये घडली आहे.

भारतीय परराष्ट्रमंत्रालयाचे सचिव हरिनदम बागची यांनी ही माहिती दिली आहे.खरकिव मध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेला शेखरप्पा ग्यानगौडा नवीन हा एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. नवीन हा मूळचा चलागेरी, कर्नाटक राज्यातील विद्यार्थी आहे. त्याच्या मृत्यूने भारताला मोठा धक्का बसला आहे.