उद्या शरद पवारांच्या निवासस्थानी १५ पक्षांची महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीत आहेत. शरद पवार यांनी उद्या म्हणजेच मंगळवारी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला १५ पक्षांचे नेते सामील होणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत राष्ट्रमंच या बॅनरखाली एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्या मोदी सरकारच्या धोरणांविरोधात राष्ट्र मंचाची उद्या ४ वाजता दिल्ली येथे बैठक होणार आहे. शरद पवार पहिल्यांदाच बैठकीत भाग घेतील. २०१८मध्ये यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंच स्थापन केला. सिन्हा आता टीएमसीचे उपाध्यक्ष आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*