गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण संगित क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. भारतीय संगीत विश्वातील एक सुवर्ण तारा निखळला असल्याची प्रतिक्रिया
केंद्रीय अध्यक्ष विमुक्त घुमंतु एवं अर्ध घुमंतु जनजाती कल्याण एवं विकास बोर्ड नई दिल्ली (भारत सरकार ) सदस्य – निति आयोग उपसमिती (भारत सरकार) दादा इदाते यांनी दिली आहे.
वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर या देशाचा अभिमान होत्या. १९६९ मध्ये पद्मभूषण, १९७२ ‘परी’मधील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार, १९७४ ‘कोरा कागज’ मधील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १९८९ दादासाहेब फाळके पुरस्कार,१९९० लेकिन चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्व गायिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार, १९९९ ‘पद्मविभूषण’, तर २००१ ‘भारतरत्न’ अशा अनेक प्रकारचे सन्मान त्यांना प्राप्त आहेत. त्यांचे संगीत, व देशभक्तीवर आधारित गीत व त्यांनी गायलेली गाणी पिढ्यान पिढ्याला प्रेरणा देतील, त्यांच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याची ईश्वर ताकद देवो असे दादा इदाते म्हणाले.