आता लवकरच येणार ओमायक्रॉन विरोधातील प्रभावी लस

▪️ देशात सध्या करोनाच्या रुग्णसंख्येसोबतच करोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

▪️ या नव्या प्रकाराचं निश्चित स्वरुप अजूनही लक्षात आलेलं नाही. तज्ज्ञ याविषयी अभ्यास करत आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या लसी त्या विषाणूप्रकारावर कितपत प्रभावी आहे, याबद्दलही मतमतांतरं आढळतात.

▪️ मात्र, या सगळ्यातच आता ओमायक्रॉन विषाणूशी लढणाऱ्या लसीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

▪️ फायझर या लस उत्पादक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोएर्ला यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, फायझर आधीच कोविड लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहे.

▪️ जगभरातील सरकार त्यांच्या देशात करोनाच्या संसर्गाशी लढा देत आहेत. ज्यामध्ये करोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे वाढत्या रुग्णांचाही समावेश आहे.

▪️ दरम्यान, बोएर्ला यांन सांगितले की, मार्चपर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटवर लस तयार होईल. या लसीची गरज पडेल की नाही, तिचा वापर होईल की नाही हे माहीत नाही, पण तरीही आपण ही लस तयार करत आहोत, असेही ते म्हणाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*