दापोली: 10 फेब्रुवारीपासून आंबेत खाडी पूल दुरुस्ती करता बंद करण्यात आला. या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून फेरीबोटीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता.

त्यानुसार सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची फेरीबोट 10 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली होती.

या फेरी बोटीच्या तिकिटाचा खर्च कमी करण्यात यावा किंबहुना पूर्णतः मोफत फेरीबोट सेवा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केल्यामुळे; आज झालेल्या प्रदीर्घ सभेनंतर तोडगा न निघाल्यामुळे फेरीबोट सेवा बंद करण्यात आली.

मात्र विद्यार्थ्यांसाठी फेरीबोट सेवा सुरू ठेवण्यात आली असून रोज चार फे-या सुरू असल्याची माहिती डॉ. योगेश मोकल यांनी दिली असून; पुढील आठ दिवसात कोणताही निर्णय मेरीटाईम बोर्ड, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शासनाने न दिल्यास नाईलाजाने ही सेवा पूर्णतः बंद करावी लागेल अशी माहिती डाॅ. योगेश मोकल यांनी दिली.