मंडणगड : मोठा गाजावाजा करत आंबेत पूल सुरू झाल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या. एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आता या निमित्ताने दिलासा मिळेल, असं वाटत असताना पाच दिवस उलटून सुद्धा एसटी बस सेवा अद्यापही या आंबेत पुलावरून सुरू झाली नाहीये.

पुल सुरू झाल्याचं पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. पण रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पुल बंद केल्याचं पत्र काढलं होतं पण पुन्हा पुल सुरू झाल्याचे पत्र काही अद्यापही काढलेलं नाही.

त्यामुळे एसटी बस या पुलावरून सुरू होत नाहीये आणि रत्नागिरी एसटी विभाग हात वर करायला मोकळी झाली आहे.

या पुलावरून एसटी बस सुरू नसल्याचे दोन तोटे प्रवाशांना सहन करावे लागत आहेत. एक तर वळसा मारून त्यांना मुंबईकडे जावं लागतंय आणि दुसरा त्यांना नाहक जादाचे पैसे मोजावे लागतात आहे.

दरम्यान ज्या काही एसटी गाड्या ब्रिज वरून जात आहेत त्या धोकादायक पद्धतीने स्वतःच्या रिस्कवर जात आहेत, असंच स्पष्ट होत आहे.

आंबेत पुल अनेक वर्ष बंद असून त्याचा फटका सर्वसामान्य माणसांना आज देखील बसत आहे. श्रीमंत माणसांसाठीच पुल खुला झाला आहे आणि सर्वसामान्य गरिबांसाठी तो आजही बंद आहे, असंच या निमित्ताने म्हणावं लागत आहे.

आता आंबेज पुल गरिबांसाठी कधी उघडेल याचीच वाट सगळे जण पाहत आहेत. दरम्यान सर्वसामान्य माणसाला आजही आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत आहे.

आता लोकप्रतिनिधी याकडे कशा पद्धतीने लक्ष देतात हेच पाहणं खूप महत्वाचं आहे.