
रत्नागिरी : जिल्ह्यातील मुस्लिम ओ. बी. सी. समाजासाठी रत्नागिरीमध्ये ॲाल इंडिया मुस्लिम ओबीसी ॲार्गनायझेशनच्या कार्यालयाचं रत्नागिरी येथील चर्मालय परिसरात राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्र मध्ये ॲाल इंडिया मुस्लिम ओबीसी ॲार्गनायझेशनचे शब्बीर अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात काम सुरु असून तेच काम रत्नागिरीमध्ये अनेक वर्ष सुरु आहे.
ओ. बी. सी.मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न आहेत. त्या समाजाला अनेक वर्ष ओ. बी. सी.च्या विविध योजना पासून वंचित ठेवण्यात आले. दाखले देण्यास शासनाचे जिआर असताना जाचक अटी लावण्यात आल्या आणि दाखले देण्यास टाळा टाळ करण्यात आले.
मात्र यासाठी रत्नागिरीमध्ये या ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ॲार्गनायझेशनच्यावतीने मुस्लिम ओ. बी. सी. कार्यालयच्या माध्यमातून या समस्या सोडवण्यात येणार आहे.
या कार्यालयातुन ओ. बी. सी. मुस्लिम समाजाला मार्गदर्शन करण्यात येणार असून समाजातील लोकांनी याचा लाभ घेणं गरजेचं आहे.
या कार्यालय उदघाट्न प्रसंगी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष अमजद बोरकर, जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन, बाळासाहेब पाटणकर, डॉ. मतीन परकार, ईद्रीस फजलानी, मुदस्सर मुकादम, ऍड. खतीजा प्रधान, नसीमा डोंगरकर, दरबार शेठ, जमूरत अलजी, शेख अहमद हुश्ये, रमजान गोलंदाज, रहीम दलाल, जमीर खलफे, मुजीब जांभरकर, शकूर संगमेश्वरी, निसार राजपूरकर, इम्रान सोलकर, शब्बीर भाटकर, अतिक साखरकर, मुझम्मील काझी, जैनुद्दीन दाभोलकर आदि उपस्थित होते.

Leave a Reply