अक्षय फटक आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार

दापोली (प्रतिनिधी) : सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे आणि जालगावचे अपक्ष सरपंच अक्षय फाटक आज भाजपामध्ये दुपारी एक वाजता अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत.

अक्षय फाटक यांनी तरुण वयातच दापोलीमध्ये विकासक म्हणून नाव मिळवलं आहे. दापोली आणि परिसरामध्ये सामाजिक अनेक उपक्रम देखील त्यांनी राबविले आहेत.

जालगाव गावासाठी त्यांनी रुग्णवाहिका सुद्धा यापूर्वी दिलेली आहे. ज्याचा फायदा अनेक रूग्णांना झालेला आहे. सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देण्याचं कार्य त्यांनी सातत्याने केलं आहे. क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन स्पर्धेच्या माध्यमातूनही अक्षय फाटक यांनी खेळाडूंसाठी चांगल्याप्रकारे वातावरण निर्मिती केली आहे.

अक्षय फाटक यांच्या भाजपा प्रवेशामुळे दापोलीमध्ये पक्षाला बळकटी मिळण्यास मदत मिळेल. अक्षय फाटक यांच्या सोबत अमोल मुंगशे, जालगाव ग्रामपंचायतीचे दोन विद्यमान सदस्य, शाखाप्रमुख, माजी उपसरपंच, विरेंद्र लिंगावळे आदी कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार आहेत.

अक्षय फाटक यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*