उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश

पुणे- पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुणे विभागीय आयुक्तांना याचा अहवाल मागितला आहे.

पत्रकारांनी पांडुरंग यांच्यावर उपचार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी ठरले. सर्वसामान्य नागरिकांना या जम्बो सेंटरमध्ये पाणीही मिळत नाही. खाजगी हॉस्पिटलमध्ये बेडसही मिळत नाही. मंगळवारी रात्री 10 पर्यंत पांडुरंग यांच्यावर उपचार करण्यासाठी बेड मिळाला नाही. 100 कोटी रुपये खर्च करून जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी आंबूलन्स न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या

हॉस्पिटलमध्ये आरोग्य यंत्रणा उपलब्ध नाही. पांडुरंगचे कुटुंब मोठ्या दुःखात आहे. सर्वाधिक मृत्यू पुणे शहरात होत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही पांडुरंगच्या मृत्यू प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्तांशी चर्चा करण्यात आली आहे.

पांडुरंगच्या आठवणीने पत्रकारांनाही अश्रू अनावर

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यांच्या आठवणीने आज अनेक पत्रकारांना अश्रू अनावर झाले. 100 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार होत नसतील तर हे हॉस्पिटल उभारून काय उपयोग झाला, असा सवाल अनेक पत्रकारांनी उपस्थित केला.

पांडुरंग हा आपल्यामध्ये नाही, याची मोठी खंत असल्याचे पत्रकार वैभव सोनवणे यांनी सांगितले. पांडुरंगला बेडस उपलब्ध करून देण्यासाठी अनेक पत्रकारांनी प्रयत्न केले. आमच्या सहकाऱ्याची अशी अवस्था झाली असेल तर सर्वसामान्य नागरिकांची व्यवस्था काय असेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या जाम्बो सेंटरमध्ये 800 बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, डॉक्टर आणि इतर स्टाफ नसल्याचे पत्रकार शैलेश काळे म्हणाले. केवळ उद्घाटन करण्यासाठी हे जम्बो कोविड सेंटर सुरू केले का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पुणे शहरात कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर झाली आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रसार पुणे शहरात वाढत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*