दापोली : केळशी वरचा डोंगर येथील प्रवीण कुटे (वय 47) यांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रवीण कुटे यांची पत्नी प्रीती कुटे यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती प्रवीण कुटे यांनी सकाळी 7.15 च्या सुमारास नायलॉन दोरीच्या साह्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. कुटे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. प्रवीण कुटे यांनी घर बांधण्यासाठी कर्ज काढलेले होते. त्यामुळे ते काही दिवस तणावाखाली असल्याचे घरातील लोकांचे म्हणणे आहे.