१३ मार्च पासून रत्नागिरी तील नऊही पंचायत समितीवर प्रशासकाची नियुक्ती

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ ही पंचायत समित्यांवर निवडूण आलेल्या सदस्य आणि सभापती, उपसभापती पदाची मुदत १३ मार्च रोजी संपणार आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेची मुदत २० मार्च रोजी संपणार असल्याने, जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील नऊ ही पंचायत समित्यांवर गटविकास अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी तसे आदेश दिले आहेत.

रत्नागिरी जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर जिल्ह्यातील नऊ पंचायत
रत्नागिरी, लांजा, राजापूर, खेड,चिपळूण, मंडणगड, दापोली,देवरुख, संगमेश्वर अशा नऊ ही पंचायत समित्यांवर प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी पंचायत समितीवर नियुक्त करण्यात आले आहेत. तशी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.