आयपीतील स्पर्धांचा यंदाचा हंगाम हा कोरोनाच्या सावटाखाली संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
या स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर बंगळुरू अर्थात RCB या संघात आदित्य ठाकरेचा समावेश करण्यात आल्यामुळे सध्या हे नाव चर्चेत आले आहे.
प्रकरण काय? :
स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणारा विदर्भाचा गोलंदाज आदित्य ठाकरे याची निवड RCB च्या डेव्हलपमेंट स्कॉडमध्ये झाली आहे.
सद्यस्थितीत नेट्समध्ये फलंदाजांना सराव देण्यासाठी आदित्यची निवड करण्यात आली असून यामध्ये चांगली कामगिरी केल्यास त्याला पुढेही संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
आदित्यला 2018 मध्ये खेळाडू जखमी झाल्यानंतर ज्युनिअर वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडला पाठवण्यात आले असता त्याने तिथे केलेल्या दमदार कामगिरीमुळे तो प्रकाशझोतात आला होता.
दरम्यान, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या नावाशी साधर्म्य असल्याने RCB संघ आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा सध्या माध्यमांत रंगली आहे.