रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाप्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा आहे. सुमारे दहा हजार लशी सध्या शिल्लक आहेत. जिल्ह्यात अठ्ठावीस टन ऑक्सिजन सध्या शिल्लक असून तो सुमारे तीन दिवस चालेल. त्यापुढे ऑक्सिजनची कमतरता जिल्ह्यात भासू नये, यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत ही ऑनलाइन पत्रकार परिषद झाली.