रत्नागिरी जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्ण 100

 


रत्नागिरी : जिल्ह्यात काळपासून 10 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 459 झाली आहे. तर आज 9 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 343 झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी 74.72 टक्के झाली.

दरम्यान आज बरे झालेल्या कामथे येथील एका रुग्णास पुन्हा ॲडमीट करण्यात आले. त्याला श्वसनाला त्रास होता. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले होते. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 459 इतकीच आहे. तथापि रुग्णालयात दाखल असणाऱ्या ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मात्र आता 100 झालेली आहे. आतापर्यंत 17 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णातील 2 हे शहरातल्या कोकणनगर, रत्नागिरी भागातील आहेत तर 1 रुग्ण श्रृंगारतळी, गुहागर येथील आहे. इतर सात रुग्णांपैकी खेड तालुक्यातील शिवतर येथील 1 रुग्ण, 2 रुग्ण तळे, कासारआडी, 1 रुग्ण कर्टेल तर 1 रुग्ण खवटी आणि देवरुख- संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील 1 व कडवई येथील 1 रुग्ण आहे. यातील कोकण नगर मधील काही क्षेत्रास कोरोना विषाणू बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

बरे झालेल्या 9 रुग्‍णांना आज घरी सोडण्यात आले. यातील 5 रुग्ण जिल्हा कोव्हीड रुग्णालयातील तर 3 रुग्ण कोव्हीड केअर सेंटर समाज कल्याण व 1 रुग्ण कोव्हीड केअर सेंटर पेढांबे येथील आहे.

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन

जिल्ह्यात सध्या 47 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 11 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 01, खेड तालुक्यात 6 गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात 1, दापोली मध्ये 06 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 10 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 6 आणि मंडणगड मधील 01 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरण

संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 6, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा इन्स्टीटयुट, लवेल, खेड – 5, उपजिल्हा रुग्णालय गुहागर-1, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – 8, कोव्हीड केअर सेंटर साडवली संगमेश्वर -2 असे एकूण 26 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.

होम क्वारंटाईन

मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 47 हजार 88 इतकी आहे.

7 हजार पेक्षा जास्त अहवाल निगेटिव्ह

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 7 हजार 974 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 7 हजार 7735 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 459 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 7 हजार 256 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 239 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 239 प्रलंबित अहवालमध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे, 162 अहवाल मिरज आणि 73 अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.

परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 17 जुन 2020 अखेर एकूण 1 लाख 40 हजार 779 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 68 हजार 131 आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*