जंगल सर्वेक्षण अहवालात महाराष्ट्र देशात जास्त हिरवळ

फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचा ‘जंगल सर्वेक्षण अहवाल’ नुकताच जाहीर झाला. महाराष्ट्र देशात सर्वात जास्त हिरवागार असल्याचे त्यात म्हटले आहे. राजधानी मुंबईही हिरवाईच्या बाबतीत कमी नाही. मुंबईत 111 चौरस किलोमीटर इतके जंगलक्षेत्र आहे. दिल्लीनंतर मुंबई याबाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
देशात सर्वाधिक झाडे महाराष्ट्रात आहेत. राज्यातील आरक्षित जंगले वगळता अन्यत्र 12108 चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये झाडे आहेत असे या अहवालात म्हटले आहे. त्यानंतर राजस्थानात 8733 चौरस किलोमीटर, मध्य प्रदेशात 8054 चौरस किलोमीटर तर कर्नाटकात 7497 चौरस किलोमीटर क्षेत्र झाडांनी भरलेले आहे असेही नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जंगलांबाहेर सर्वाधिक झाडे ही लिंबू, आंबा आणि नारळाची आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*