दापोलीतील तरूणाचा पाळंदे येथे अपघाती मृत्यू

दापोली : पुणे येथून फिरण्याकरिता आलेला लोकेश जांगिड या २७ वर्षीय तरुणाचा पाळंदे येथे अपघातात मृत्यू झाला. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

दापोली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन औटे हा पुणे हडपसर येथून दापोली मधील हर्णे या ठिकाणी फिरण्याकरिता येत होता.

त्याच्यासोबत लोकेश शामलाल जांगीड देखील होता. लोकेशचे वडील दापोलीत सुतारकाम करतात.

संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाळंदे येथील दर्ग्यासमोर आले असता गाडीवरील ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या वडाच्या झाडावर जाऊन त्यांची गाडी आदळली.

या अपघातामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. उपचाराकरिता त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोकेश जांगिड याचा उपचारादरम्यान २८ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.

गाडी चालक राजेंद्र औटे याच्यावर रत्नागिरी येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दापोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हर्णे दूरक्षेत्रचे हेडकॉन्स्टेबल डी.पी. गोरे अधिक तपास करीत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*