राज्यातील सात ते आठ जिल्ह्यात काळजी वाटावी अशी परिस्थिती -टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक

दुसरी लाट ओसरतेय असं आपण म्हणू लागलो आहोत पण ती लाट संपूर्णपणे ग्राऊंड झीरो लेव्हलला यायच्या आधीच तोवर तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे की काय अशी परिस्थिती वाटू लागली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यातील सात ते आठ जिल्ह्यात काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे, असं राज्याच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, व्हायरस आपले रुप बदलत आहे. नवीन उपप्रकार समोर येत आहेत. दुसरीकडे लसीकरण ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीनं होत नाही. कोविडसंबंधी पालन होताना दिसत नाही, यामुळं कोरोना रुग्ण वाढत आहेत. डॉ ओक म्हणाले की, तिसऱ्या लाटेचे अंदाज ही चुकूही शकतात. व्हायरस स्वतःचे स्वरूप बदलतो आहे. कोरोना व्हायरसचं चित्रं पाहिलं तर त्यात काटे दिसतात. यातील एक काटा जरी त्यानं बदलला तरी रुप बदलतं. त्यामुळे तो किती लोकांना होऊ शकतो, सामाजिक अंतर किती पाळतो, लसीकरण किती या वर तिसरी लाट अवलंबून आहे. डेल्टा प्लसची इन्फेक्टिव्हिटी जास्त आहे. आधी सहा जणांच्या कुटुंबात एकाला व्हायचा हा सर्व कुटुंबाला होतो. डेल्टाचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे, डॉ ओक म्हणाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*