दापोली- नगरपंचायतीच्या स्मशानभुमीत दररोज कोरोनामुळे जवळपास चार पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम न. प.कर्मचारी अहोरात्र करत आहेत. अंत्यसंस्कार व्यवस्था नगरपंचायत प्रशासन पुर्णपणे मोफत करण्यात आली आहे अशी माहिती मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली.यासाठी लागणारी शववाहिनी उत्साही कार्यकारि मंडळ श्री मानाचा गणपती यांच्याकडून कोरोना आपत्ति कालावधिसाठी नगरपंचायत प्रशासनाच्या पूर्णपणे मंगळवारी मोफतसेवसाठी ताब्यात देण्यात आली आहे. अशी माहिती माजी नगरसेवक सचिन गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनामुळे आलेल्या आपत्ती मध्ये नगरपंचायत जनतेबरोबर असून नागरिकांनी सहकार्य करावे मास्क वापर करावा असे आवाहन दापोलीच्या नगरध्यक्षा परवीन शेख यांनी केले आहे.यावेळी नगरसेवक प्रकाश साळवी,माज़ी नगरसेवक नितिन शिंदे, कर्मचारी दीपक सावंत, श्री मानाचा गणपती उत्साही कार्यकारी मंडळ अध्यक्ष संजय घाटगे,उपाध्यक्ष शंकर मायदेव,खजिनदार सचिन सावंत ,सचिव संदीप अमृते, संदीप केळकर, सचिन गायकवाड,नितिन शिंदे, सचिन देसाई, रोहित शिंदे ,प्रणव चव्हाण,स्वरुप महाजन, प्रितेश शिर्के, बंड्या जाधव