ए.जी. हायस्कूलमध्ये विविध प्रदर्शनांचे उत्साही उद्घाटन

दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी. हायस्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित विविध प्रदर्शनांचे उद्घाटन संस्था सचिव विनोद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान, पुष्परचना, रांगोळी, हस्तकला आणि भूगोल अशा प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण मॉडेल्स आणि सजावटींनी उपस्थितांचे लक्ष वेधले. विज्ञान प्रदर्शनात पर्यावरण संरक्षण, सौर ऊर्जा आणि जलसंवर्धन यावर आधारित मॉडेल्स मांडण्यात आली.

पुष्परचना विभागात नैसर्गिक फुलांचे आकर्षक नमुने साकारले गेले. भूगोल प्रदर्शनात भारताचा भूगोल, हवामान, ज्वालामुखी आणि चांद्रयान मोहीम यासारख्या संकल्पना मांडल्या.

रांगोळी प्रदर्शनात पारंपरिक, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक विषयांवरील रांगोळ्या सादर झाल्या, ज्यात स्वच्छ भारत, बेटी बचाओ आणि निसर्ग संवर्धन यासारखे सामाजिक संदेश देण्यात आले. हस्तकला विभागात आकर्षक वस्तूंची मांडणी करण्यात आली.

कार्यक्रमास श्रीराम माजलेकर, रवींद्र कालेकर, श्रीकांत निजामपूरकर, स्मिता सुर्वे, प्रकाश रेळकर, शरद कांबळे, अर्जुन घुले, ए.एस.पेठकर, मगदूम एस.आय., मोहिते पी.इ., दाबके आर.व्ही., शिर्के एस.एस., अनिल शेठ, आर.आर.टोपरे, सार्थक पाटील, आर्या कराड, शर्वरी नांदिस्कर, मिहीर कोपरकर, हर्षदा निवळकर, आर्यन बारे, मानसी अभ्यंकर, एच.एस.कुलकर्णी, श्रीराम महाजन यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन शैलेश आठल्ये यांनी केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*