ए.जी. हायस्कूल दापोलीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहात सुरुवात

दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी. हायस्कूलच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. शालेय समिती चेअरमन मा. श्री. रविंद्र कालेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

हे वर्ष ‘वंदे मातरम’ गीताचे दीडशेवे वर्ष म्हणून देशभर साजरे केले जात आहे. त्यानिमित्ताने स्नेहसंमेलनाची सुरुवात संपूर्ण ‘वंदे मातरम’ गायनाने झाली. प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री. शैलेश आठल्ये यांनी गीताचे महत्त्व विशद करून देस रागात संपूर्ण गायन सादर केले, ज्यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने साथ दिली.

त्यानंतर प्रतिवर्षाप्रमाणे नांदी गायनाने कार्यक्रमाला खरीझरीत सुरुवात झाली. शाकुंतल नाटकातील ‘पंचतुंड नररुंड मालधर’ या नांदीचे सादरीकरण करण्यात आले. तबला साथ श्री. मकरंद सोमण आणि संवादिनी साथ शंतनू काणे यांनी केली.

विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य, मंगळागौर, पोवाडा, शेतकरी नृत्य, आदिवासी नृत्य, भजन, जाखडी नृत्य आणि रेकॉर्ड डान्स अशा विविध कलांचे गुणदर्शन केले.

कार्यक्रमाला माजी संचालक प्रसाद फाटक, मुख्याध्यापक शरद कांबळे, उपमुख्याध्यापक अर्जुन घुले, पर्यवेक्षक ए.एस. पेठकर, शिक्षक प्रतिनिधी श्री. मोहिते पी. इ., दाबके आर. व्ही., शिक्षकेतर प्रतिनिधी शिर्के एस. एस., ज्येष्ठ शिक्षिका मानसी अभ्यंकर, ज्येष्ठ शिक्षक एच. एस. कुलकर्णी, कलाशिक्षक श्रीराम महाजन, विद्यार्थी प्रतिनिधी सार्थक पाटील, आर्या कराड, शर्वरी नांदिस्कर, मिहीर कोपरकर, हर्षदा निवळकर, अरुण बारे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*