कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती लहान मुलांना धक्कादायक ठरू शकते म्हणून त्या लाटेशी लढण्यासाठी आम्ही पुर्वतयारी सुरू केली असून लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर उभारणार असून बालरोग तज्ञांचे टास्क फोर्स तयार करू असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तिसरी लाट लहान मुलांना धक्कादायक ठरू शकते त्यादृष्टीने उपाययोजना आणि पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार जसे आम्ही रत्नागिरीत जिल्हा क्रीडा संकुल येथे महिलांसाठी १००बेडचे कोविड केअर सेंटर तसेच लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्याची तयारी सुरू केली असल्याचे सामंत यांनी स्पष्ट सांगितले आहे.